ब्रेकिंग
कर्जत तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी देवराम लगड यांची नियुक्ती

Samrudhakarjat
4
0
1
8
9
7
कर्जत (प्रतिनिधी) कर्जत तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी देवराम नानासाहेब लगड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. मीना शिवगुंडे यांची उपशिक्षणाधिकारीजिल्हा परिषद अहमदनगर या पदावर बदली झालेने या पदावरती देवराम लगड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद अहमदनगर यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.
देवराम लगड कर्जत तालुक्यामध्ये दादा या नावाने परिचित असून त्यांच्या नियुक्तीचे सर्व
स्तरांमधून स्वागत करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना, प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी, पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत या सर्वांच्या वतीने साहेबांचे अभिनंदन करण्यात येत आहे. लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता आणखी उंचावेल असा विश्वास प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केला.