सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शेतकरी बचाव पॅनल उभा केला- रविंद्र कोठारी

कर्जत (प्रतिनिधी) : – धनशक्ती विरुद्ध लढतानाच निष्ठावान कार्यकर्त्यांचा, मित्र पक्षाचा आवाज जागृत ठेवण्यासाठी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्येक विभागात एक व्यक्ती उभा करून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शेतकरी बचाव पॅनल उभा केला असल्याचे उदगार समन्वयक रवींद्र कोठारी यांनी काढले. या पॅनलच्या प्रचाराचा नारळ चांदा येथे मारुतीच्या मंदिरात फोडण्यात आला.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज शेतकरी बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अक्षयतृतीयेचे मुहूर्तावर चांदा येथे मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी या पॅनलचे निमंत्रक लालासाहेब सुद्रिक यांनी सर्वाचे स्वागत केले व शेतकरी हितासाठी अनेक वर्ष लढत आहे व पुढे ही लढणार आहे असे म्हटले. यावेळी
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय तोरडमल यांनी बोलताना धनशक्ती विरुद्ध लढण्यासाठी आम्ही उभे असून आ. रोहित पवार यांनी शेतकरी संघटनेचा एक उमेदवार घ्यावा अशी विनंती केली मात्र त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही म्हणून आम्ही आमचे नेते लालासाहेब सुद्रिक यांची उमेदवारी कायम ठेवली असून धनदांडग्यामध्ये शेतकऱ्याचा आवाज जागृत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे म्हटले.शेतकऱ्याचा शेतकरी बचाव पॅनलचे समन्वयक रवींद्र कोठारी
यांनी बोलताना निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. प्रचंड दबावाचे राजकारण सुरू आहे, संघर्ष करणारा प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काम करत असतो, जाहिरातीत छापण्यासाठी आमच्या कडे पैसे नाहीत व ज्याच्या कडे लाखो करोडो रुपये आहेत तेच निवडणुकीच्या माध्यमातून सतत पुढे येतात, कार्यकर्त्याना कोणीच वाली नाहीत. नाहीत. तालुक्यात नेतृत्व करणारे तालुक्यात नेतृत्व आज सतरंज्या टाकण्याचे काम करत आहेत ही दैनिय अवस्था असून याकडे गांभीर्याने पाहायला कोणी तयार नाही. निवडणुकीत गेली किती
वर्ष काय काम केले हे पाहून तिकीट मिळत नाही तर पैसे किती खर्च करू शकतात हे पाहून निवडणुका लढवल्या जातात, मार्केट मध्ये जाऊन लई काही मिळतेय असा विषय नाही फक्त सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकून राहावा यासाठी आम्हाला निवडून देण्याची गरज आहे. मतदार संघात दोन आमदार असताना अनेक प्रश्नांना लोकांना तोंड द्यावे प्रश्नांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. सोसायटी मतदार संघ, ग्राम पंचायत मतदार संघातील सभासदामध्ये मोठा असंतोष असून लोकमतातील व्यक्तींना उमेदवारी न देता ज्यांना
समाजाचे काहीही देणेघेणे नाही अशा लोकांना निवडून आणण्यासाठी हे दोन्ही पॅनल प्रयत्न करत असून सर्व सामान्य कार्यकर्ता निवडून आणावा यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत अशी खंत व्यक्त करत शेतकरी बचाव पॅनल मात्र सर्व सामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देणारा आहे असे आवाहन कोठारी यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ भैलुमे, रासपचे तालुकाध्यक्ष रामण्णा तोरडमल, उमेदवार केतन पांडूळे, उमेदवार रमेश व्हरकटे, उमेदवार महावीर बाफना, उमेदवार नितीन जगधने, यांचे सह किरण सुर्यवंशी, कोंडीबा सुर्यवंशी, दादासाहेब सूर्यवंशी, बापू खोमणे, कर्पे भाऊसाहेब, धनाजी सुर्यवंशी, पोपट शेटे, लखन पारसे, नंदकुमार गाडे, मयूर ओव्हळ, राहुल पोळ, पप्पू चव्हाण आदीसह अनेक जण उपस्थित होते. यावेळी रासपचे अमोल क्षीरसागर यांनी आभार मानले.