राशिन मध्ये मकतब दारुल कुरआनची सालाबाद प्रमाणे जलसा ए आम ४ थी वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी

राशीन ( प्रतिनिधी):-जावेद काझी. राशीन येथील मकतब दारुल कुरआन यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे मुस्लिम समाजाच्या लहान मुलांची धार्मिक ,सामाजिक,चौथी जलसा ए आम वकृत्व स्पर्धा शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५. रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत मक्का मस्जिद काजी गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या लहान चिमुकल्यांना तुम्ही उपस्थित अतिथी स्वरूपात मौलाना अब्दुल मजीद साहब,ईशाअती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या जलसा कार्यक्रमात १२ अभ्यासू हुशार मुस्लिम मुलांनी कुरआन पठण पूर्ण केले. व अनेक लहान मुला मुलींनी सामाजिक रित्या सध्या मोबाईल मुळे मुलांवर होणाऱे दुष्परिणाम व धार्मिकतेवर वकृत्व करीत मैदान गाजवले. या वकृत्व स्पर्धेत १३७ मुला मुलींनी धार्मिक व सामाजिक माहिती मुस्लिम समाजातील उपस्थित समाज बांधवांना थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मौलाना शहानवाज कुरेशी, अब्दुल रहीम, मौलाना शोयब, मौलाना मुसअब, मौलाना रऊफ, हा फीज हजला, हाफिज साद, हाफिज अफजल कुरेशी, हाफिज मुसद्दीक या सर्वांचे मोलाचे यशस्वी योगदान मुले घडवण्यास लाभले, तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व राशिन मधील मुस्लिम समाज बांधवांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना शहानवाज कुरेशी यांनी केले तर अब्दुल रहीम यांनी आभार मानले, या कार्यक्रमा वेळी मुस्लिम समाज बांधव, भगिनी, माता, नन्हे बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.