न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल कर्जत मधील विद्यार्थांच्या मार्फत प्लास्टिक कचरा मुक्त कर्जत अभियानास सुरुवात

कर्जत: न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये मागील दोन वर्षांपासून प्लास्टिक कचरा मुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल 100% प्लास्टिक कचरा मुक्त झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीची शपथ घेतलेली आहे ही संकल्पना आफ्रिन सय्यद यांनी कार्यान्वित केली. तसेच विद्यालयाचे समन्वयक किरण नाईक यांच्या दूरदृष्टीतून प्लास्टिक बंदीची प्रेरणा मिळाली.
प्लास्टिकचा अनियंत्रित वापर आणि त्याचा दुष्परिणाम यामुळे पर्यावर्णासहित सजीव सृष्टीची प्रचंड हानी होत आहे प्लॅस्टिकच्या भस्मासुराने सर्व जगाला विळखा घातला आहे, त्यामुळे सजीवसृष्टी वाचविण्यासाठी प्लास्टिक बंदी करणे काळाची गरज आहे.न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये दोन वर्षांपासून ही मोहीम यशस्वी रित्या राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करत आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी झाले आहे. तसेच इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रेयश शिंदे, इयत्ता नववीचा विद्यार्थी साहिब शेख, यशोधन बंडगर आणि वैष्णवी शेटे व कार्तिकी दहिफळे या विद्यार्थ्यांनी आज कर्जत शहरामधील दुकानांना प्रत्यक्ष भेट देऊन प्लास्टिक मुक्ती अभियानाच्या हस्तपत्रिका चिटकवल्या. तसेच पालकांनीही या प्रोत्साहन दिले आणि त्याची कार्यवाही केली. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या बाटल्यांचा वापर करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाडांसाठी कंपाऊंड बनविले.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावेल. सर्व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या बाटल्या मध्ये भरून, त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उत्सफूर्तपणे सहभाग दर्शविला. या मुळे प्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन योग्य पध्दतीने होईल. न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल कर्जत तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे की जेथे सर्वांनी प्लास्टिक बंदीची मोहीम उत्सफूर्तपणे हाती घेवून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केलेली आहे.
संस्थेचे मार्गदर्शक संभाजी लांगोरे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर), किरण नाईक (समन्वयक), शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) यांचे प्लास्टिक कचरा मुक्त अभियान यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षकवृंद यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे.