डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शिल्लक पैशातून राशीन येथे समाज मंदिरात पुस्तक वाचनालय सुरू.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केलेल्या लोकवर्गणीतून जयंती मोठ्या उत्साहात पार पडली मात्र जयंती झाल्यानंतर वर्गणीतुन शिल्लक राहिलेल्या पैशाचे करायची काय हा प्रश्न राशीन भीमसैनिकांपुढे उभा राहिला सर्वानुमते विचार करून शिल्लक राहिलेल्या पैशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचनालय करण्याचे सर्वानुमते एकमताने ठरताच त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी रात्री आठच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचनालयाचे उद्घाटन पीएचडी प्राप्त डाँ. देविदास साळवे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी घोडके गुरुजी महात्मा फुले पतसंस्था मार्गदर्शक, बौद्धाचार्य कांबळे दिगंबर, पर्यवेक्षक राजेंद्र साळवे, सोनवणे सर,
युवकांचे आधारस्तंभ भीमराव साळवे, रामकिसन साळवे ,मुख्याध्यापक आडगळे साहेब, साळवे प्रमोद महाराष्ट्र बँक मॅनेजर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले, कृषी अधिकारी दत्ता भोसले, सॉलेहीन शेख, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, दीपक थोरात , दया आढाव प्राथमिक शिक्षक अनिल गुरुजी, जयंती उत्सव समिती उपाअध्यक्ष आढाव मुकुंद रमेश, सामाजिक कार्यकर्ते गणेश साळवे, प्रवीण बापू साळवे, राहुल गोविंद साळवे, इतर भीमसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी प्रमुख मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकी माध्यमातून दिलेला संदेश सर्वांनी जोपासित ज्ञान संपादित करावे.
तसेच कोणतेही पुस्तक वाचनालयातून नेताना परत आणून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने झोपासावी. तरच पुस्तक वाचनालय चालेल असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त अतुल साळवे यांनी केले.