जगात सर्वात सुंदर स्त्री आपली आई असते – डॉ. संजय कळमकर
प्रतिभा ही झोपडीत, रानावनात व खेड्यात जन्म घेते - डॉ. संजय कळमकर

कर्जत (प्रतिनिधी) :- ‘संस्कृतीला छेद देणारी गोष्ट सध्याच्या तरुणाईच्या कपड्यांवरून दिसते आहे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे सहन झाले नसल्यानेच कोटा व अन्यत्र ठिकाणी मुले आत्महत्या करत आहेत. एखाद्या क्षेत्रात क्षमता नसेल तर पालकांना विद्यार्थ्यांनी आज ठामपणे नकार द्यायला शिकले पाहिजे. समाजामध्ये सगळेजण फसवतील पण आई वडील कधीही फसवणार नाहीत, या जगात सगळ्यात सुंदर आई असते. प्रतिभा ही झोपडीत, रानावनात व खेड्यात जन्म घेत असते. पुरुषांचे सौंदर्य कर्तृत्त्वात असते, अंतर्मनातील कला हे तुमचे खरे प्रेम आहे. आभासी जगातील भुरळीच्या नादी न लागता या वयात क्षमता जागृत करा’ असे आवाहन डॉ. संजय कळमकर यांनी केले. ते दादा पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवण्यासाठी, मन मेंदू आणि मनगट एकत्र करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी २०२४ पासून कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वैचारिक बैठकीचे अधिष्ठान प्राप्त व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे व विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, बाळासाहेब साळुंके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, उद्धवनाना तनपुरे, विशाल म्हेत्रे, पत्रकार गणेश जेवरे, विजय तोरडमल, तात्यासाहेब ढेरे, भाऊसाहेब रानमाळ, प्रा. भास्कर मोरे, सागर लाळगे, अमित तोरडमल, प्रा. अंगद गरड, साळुंके मेजर, सागर मांडगे आदि मान्यवर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयामध्ये कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये देश, राज्य व विद्यापीठ पातळीवर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाची राष्ट्रीय कुस्तीपटू आणि सुवर्णकन्या सोनाली मंडलिक, राष्ट्रीय कबड्डीपटू संस्कृती शिंदे, राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग सुवर्ण कामगिरी करणारे आकाश तोरडमल, प्रतीक्षा कोरे, ऋतुजा बर्डे, ऋतिका बर्डे, राष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेले अभिजित धुमाळ, ओमकार डमरे, प्रताप काळे तसेच अक्षय दले, संभाजी वाबळे, रोहन बिनवडे, अनिकेत अनारसे, प्राची सुद्रिक यांचा सन्मान केला. जिमखाना विभागाचे अहवालवाचन कार्याध्यक्ष व क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेमार्फत जाणारा नीलिमा पवार सुवर्णपदक विजेती प्राजक्ता पठारे, प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे पतसंचलन करणारा प्रथमेश डाके, जेईई परीक्षेत ९९.६०% व गणित ऑलिंपियाडमध्ये राष्ट्रीय स्तरावर पात्र प्रशांत सुथार, कर्मवीर करंडक, राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा व वर्ल्ड डेटाॅक्स डे निमित्त मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे प्रेझेंटेशन केलेले गणेश पवार, प्रीती शिंदे, प्रकाश शिंदे, अजित पवार, विवेक गायकवाड, ज्ञानेश्वर वायसे, कल्याणी बोरा, समृद्धी बोरा, आदित्य केंदळे हे सांस्कृतिक विभागाचे सर्व विद्यार्थी, विद्यापीठ स्वररंग युवा महोत्सवामध्ये शास्रीय गायन वैष्णवी नागवडे-प्रथम, स्वरवाद्य नुपूर लहाडे तृतीय, तालवाद्य सौरभ खामगळ द्वितीय, सौरभ ढवळे प्रश्नमंजुषा, सतीश वाघमारे प्रश्नमंजुषा, महेश रोकडे प्रश्नमंजुषा, प्रियांका घाडगे-स्पॉट पेंटिंग, गोडसे ऋतुजा प्रथम- मेहंदी तसेच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भुते रोहिणी संजय- प्रथम, शेटे ऋतुजा बाळासाहेब- द्वितीय, गदादे दीक्षा संभाजी तृतीय, हडपसर येथे पार पडलेल्या मानाच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महेश रोकडे ,सौरभ ढवळे यांना चौथा क्रमांक, राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये ज्युनियर विभागातून कापसे आदित्य गंगाधर व गदादे वैष्णवी, विज्ञान व गणित ऑलिंपियाड मध्ये राऊत गीतांजली, गव्हाणे वैष्णवी, समुद्र शुभम, जाधव दीक्षा, जगताप श्रुती सुवर्णपदक विजेते, विद्यापीठाच्या अविष्कार स्पर्धेमध्ये पाडवी मनमोहनसिंग, अमोल परदेशी, सुप्रिया गावडे, जाधव राकेश, हर्षदा नरसाळे यांनी पहिले मानांकन मिळविले. या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा विशेष गौरव समारंभामध्ये सन्मान करण्यात आला. कला विभागाचे अहवालवाचन डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी नेमणूक झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ डॉ. संजय चौधरी, प्रा. सागर शिंदे, प्रा. स्वप्निल म्हस्के, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा.जयदीप खेतमाळीस, प्रा. प्रवीण घालमे, प्रा. सुनील देशमुख, डॉ. दत्तू शेंडे, डॉ. संदीप पै, प्रा. संतोष क्षीरसागर, प्रा.शिवाजी धांडे या प्राध्यापकांच्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल त्यांचाही सन्मान या कार्यक्रमप्रसंगी करण्यात आला. महाविद्यालयाच्या कर्मज्योती वार्षिक नियतकालिकास पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.भास्कर मोरे, पेटंट प्राप्त डॉ.श्रीपाद पाटील, पीएच. डी पदवी संपादन केल्याबद्दल डॉ.जी. डी. सुर्यवंशी यांना यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी तर आभार कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश धांडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.स्वप्निल म्हस्के व डॉ. प्रतिमा पवार यांनी केले.