दहावीत चांगले मार्क मिळवूनही पायलने निवडली कला शाखा

कर्जत (प्रतिनिधी) :- मार्च २०२३ च्या दहावी बोर्ड परीक्षेत पायल सुमतीलाल गायकवाड हिने ९१.८०% गुण संपादन केले आहेत. एवढे भरमसाठ मार्क असताना तिने इतर शाखेत प्रवेश घेण्याऐवजी रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयात कला शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे. पायलला कला शाखेतून पुढील शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत जाण्याची तीव्र इच्छा आहे. स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित झालेल्या पायलने आतापासूनच अभ्यासाची तयारी केलेली आहे. दादा पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेकरिता आवश्यक ग्रंथ सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाचाही तिला फायदा होईल.
दादा पाटील महाविद्यालयात पायलने कला शाखा निवडून प्रवेश घेतल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी तिचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्राचार्य मोहनराव खंडागळे, कला विभागाचे उपप्राचार्य प्रतापराव काळे, क्रीडा संचालक शिवाजी धांडे, डॉ. संदीप पै, डॉ. माधुरी गुळवे, डॉ. संतोष लगड आदि उपस्थित होते