
Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या सेट परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. अमोल परदेशी व वाणिज्य शाखेच्या प्रा. अमृता खराडे या उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या यशाबद्दल महाविद्यालय समितीचे सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी अभिनंदन केले.