श्री संत सदगुरु गोदड महाराजांच्या संवत्सरीत यंदा धन-धान्याची वृद्धी होईल.

कर्जत प्रतिनिधी :- यावर्षी पाऊस चांगला पडून धान्य समृद्धी होईल. रोगराई वाढेल पण जनता सुखी राहील. लोकांमधील मैत्री वाढेल. मात्र वायव्येकडील देशांची स्थिती चांगली राहणार नाही असे भाकीत कर्जत येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीमध्ये व्यक्त करण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गोदड महाराजांच्या संवत्सरीचे वाचन करण्यात येते. यंदा शोभकृत (शोभन नाम) संवत्सर असून या संवत्सराचा स्वामी बुध व गुरु आहे.
कर्जत येथील थोर संत सदगुरु गोदड महाराजांनी संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये पीकपाणी याचप्रमाणे राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे. या संवत्सरीचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीमध्ये केले जाते. बुधवार, दि २२ रोजी पुजारी पंढरीनाथ काकडे व अनिल महाराज काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले. या वर्षी वायू नावाचा मेघ असल्या सोसाट्याचे वारे सुटून संकटे उदभवतील धान्याची नासाडी होईल. घटाचे नुकसा होईल. चैत्र वैशाख दोन्ही महिने सम प्रमाणात असून आर्थिक स्थिती, वातावरणातील तापमान, व्यापारातील तेजी मंदी सारख्याच प्रमाणातील राहतील. जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन महिन्यात परिस्थिती चढ- उताराची म्हणजेच अस्थिरतेची राहील. तर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यात परिस्थती चैत्र – वैशाख प्रमाणेच सम राहील. यंदाच्या संवत्सरीत पावसाची स्थिती पाहता वादळे होणार असल्याने पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. राजा बुध असल्याने पाऊस चांगला पडून धन-धान्याची वृद्धी होईल. तसेच मंत्री शुक्र आणि मेघाशिप गुरु असल्या पावसाचे प्रमाण चांगले राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. हे भाकीत संपूर्ण जगाच्या बाबतीत वर्तविण्यात येते. यावेळी संत सदगुरु गोदड महाराजाच्या मंदिराचा मुख्य गाभारा द्राक्षाच्या घडाने सजविण्यात आला होता. यावेळी शरद काकडे, मेघनाथ पाटील, प्रवीण घुले, संजय काकडे, भागवत काकडे, अभय पाटील, सुरेश खिस्ती, उदय काकडे, अरुण भणगे, गोविंद काकडे, दत्तात्रय शिंदे, नाना भोगे, नाना सोनमाळी, ईश्वर नलवडे, मालोजी सुरवसे यांच्यासह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.