रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने निर्मित रोटरी ऑक्सिजन पार्क चा प्रथम वर्धापन दिन

कर्जत (प्रतिनिधी) :- रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने निर्मित रोटरी ऑक्सिजन पार्क च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संघटनांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सर्व सामाजिक संघटना कर्जत ,नागर फाऊंडेशन रवळगाव, ग्रामपंचायत थेरगाव, ग्रामपंचायत दूरगाव, ग्रामपंचायत बेनवडी, ग्रामपंचायत सिद्धटेक, माळंगीचे सेवेकरी,माळंगी, एनसीसी विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत, डॉ.मधूकर काळदाते पर्यावरण प्रेमी टिम यांनी पर्यावरण रक्षणासाठी, संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व रोप देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रा. सतिष काका पाटील नगरसेवक तथा उपगटनेते नगरपंचायत कर्जत यांनी या रोटरी ऑक्सिजन पार्कसाठी आपल्या विहिरीतील पाणी गेल्या वर्षभर उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र व रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव साहेब, गटविकास अधिकारी श्री अमोल जी जाधव साहेब, नगराध्यक्षा सौ उषाताई राऊत, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे फाउंडर चेअर संदीप काळदाते रोटरीचे प्रेसिडेंट संदीप गदादे सेक्रेटरी सचिन धांडे रोटरी ऑक्सिजन पार्क या प्रोजेक्टचे चेअरमन रो.प्रा.विशाल मेहेत्रे उपस्थित होते.
याचबरोबर रोटरीचे सदस्य जामखेड तालुका कृषी अधिकारी रो.श्री.राजेंद्र सुपेकर साहेब, नगरसेविका सौ ज्योतीताई शेळके, नगरसेवक श्री.देविदास आबा खरात, नगरसेवक श्री रवींद्र सुपेकर,दूरगावचे सरपंच श्री अशोकजी जायभाय, सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार, सर्व सन्माननार्थी, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सर्व सदस्य, नगरपंचायत चे पदाधिकारी व अधिकारी, स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन रो.प्रा.विशाल मेहेत्रे सर यांनी केले.यावेळी श्री अशोकजी जायभाय, श्री महेशजी जगताप, श्री भाऊसाहेब रानमाळ मेजर, गटविकास अधिकारी श्री अमोल जी जाधव साहेब, पोलिस उपविभागीय अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव साहेब , नगराध्यक्षा सौ उषाताई राऊत, रोटरी क्लबचे फाउंडर चेअर डॉ संदीप काळदाते यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सेक्रेटरी रो.प्रा.सचिन धांडे सर यांनी मानले.सूत्रसंचालन रोटरीचे सदस्य प्राचार्य रो.चंद्रकांत राऊत सर यांनी केले.
यावेळी माझी वसुंधरा शपथ व जलबचत शपथ घेण्यात आली.