अब की बार शांती से अगली बार क्रांती से आम्ही आंबेडकरवादी समुहाचा निर्धार

कर्जत प्रतिनिधी -परभणी येथे झालेल्या घटनेचा कर्जत तालुक्यातील समस्त भिम सैनिकांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. याबाबत सोमवारी कर्जत पोलिस निरीक्षक व तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले असून या प्रकरणी निरपराध लोकांना अटक करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी शहरामध्ये जातीयवादी समाजकंटकांनी जातिद्वेष भावनेतून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे तसेच देशद्रोही घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः परभणीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपींना पकडण्याचे सोडून कोम्बिंग ऑपरेशन चालवून अनेक भिमसैनिकाना अटक केलेली आहे. वास्तविक पाहता प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे तसेच संविधानाची शिल्पाची तोडफोड करुन अपमान करणाऱ्यांना व सर्व हल्लेखोर समाजकंटकांना तात्काळ अटक करणे गरजे होते. असे असताना येवढी मोठी घटना होऊन ही पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी हि घटना घडली आहे पोलिसांनी आरोपील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करणे गरजेचे होते पन असे न करता पोलिस प्रशासन निरपराध भीमसैनिकाना अटक करत आहे तरी हे अटक सत्र थांबवावे. व भिम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्युस जबाबदार अधिकारी वर्गावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा
अन्यथा आम्ही आंबेडकरवादी समुहाच्या वतिने कर्जत तालुक्यात उग्र स्वरूपाचे अब की बार शांती से, अगली बार क्रांती से… करण्यात येईल असा इशारा नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी आम्ही आंबेडकरवादी समुहाच्या वतिने देण्यात आली .
यावेळी अँड दत्तात्रय चव्हाण सरपंच भिमराव साळवे उप सरपंच बापुसाहबे साळवे सरपंच अमोल चव्हाण ग्रा प सदस्य अशोक जाधव ग्रा प सदस्य अश्रय भवर लश्र्मण आखाडे सागर डाळिबे सरपंच सचिन चव्हाण वैभव हिरभक्त कुलदीप गंगावणे दिपक सातव सरपंच अविनाश चव्हाण
सरपंच अनिल गगावणे काळु गगावणे सुनिल गाडे सरपंच संभाजी सोनवणे नारायण घोडके मंगेश घोडके अविनाश गायकवाड रविंद्र दामोदरे कमलेश साळवे अशोक कांबळे विवेक धाकतोडे रिपाईचे विशाल काकडे रिपाईचे सतिश भैलुमे निलेश चव्हाण
सोहन कदम संजय म्हस्के अजय भैलुमे विजय साळवे
पै संतोष आखाडे करण ओव्हळ अनुराग भैलुमे किरण भैलुमे सुशांत भैलुमे सचिन गोरे सुमित भैलुमे बापु कांबळे दादा साळवे सोनु आल्हाट अदित्य भैलुमे महेश धावडे राजेश मोरे धनंजय कांबळे मनोज भैलुमे मिलिद आखाडे राजेंद्र भैलुमे अंबादास कांबळे वंचितचे पोपट शेटे अमोल शिंदे किशोर पारसे सुरज सातव संतोष सांतव, कैलास गजरमल, गणेश थोरात चंद्रकांत कांबळे दुर्योधन म्हस्के नितिन थोरात आदि भिम सैनिक उपस्थित होते.