पै.श्याम कानगुडे यांच्या प्रयत्नाला यश राशीन मुख्य धूळयुक्त रस्त्यावर सार्वजनिक विभागाकडून टँकरद्वारे पाण्याची फवारणी सुरू.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .राशिन मुख्य बाजारपेठेतून दौंड धाराशिव राज्य मार्ग रस्त्याचे काम सुरू असून सध्या दोनो बाजूच्या ड्रेनेज लाईनचे काँक्रिटीकरण काम चालू असून रस्त्यावरील दोन फूट खोल माती समांतर रित्या काढल्यामुळे राशिन मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना व ग्राहकांना व इतर वाहन चालकांना गेल्या पंधरा दिवसापासून धुळीचा त्रास होत असताना
राशीन येथील माजी पंचायत समिती सभापती पै. शाम कानगुडे यांच्याकडे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीबाबत दुकानदार व ग्रामस्थांची तक्रार जाताच श्याम कानगुडे यांनी विलंब न लावता सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ फोन करून बोलावून घेऊन मुख्य बाजारपेठेतील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे पाणी फवारणी करण्याचे आदेश देतात संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेत तात्काळ रस्त्यावर दोन्ही बाजूने पाण्याची फवारणी तात्काळ सुरू केली असून सध्या दैनंदिन दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाणी फवारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असल्यामुळे पै. श्याम कानगुडे यांचे मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त होत असून केलेल्या महत्वकांक्षी कामाचे कौतुक होत आहे.