आ. रोहित पवार यांच्या हस्ते उपजिल्हा रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

कर्जत (प्रतिनिधी): – कर्जत चे आ. रोहित दादा पवार यांच्या हस्ते उपजिल्हा रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी बोलताना आ. रोहित दादा पवार म्हणाले की,
पुर्वी आपणास दिव्यांग प्रमाणपत्र हे नगर येथून मिळत होते आता कर्जत येथे मिळते आहे याचा फायदा कर्जत तालुक्यातील दिव्यांग लोकांना झाला आत्तापर्यंत ८ वेळा दिव्यांग तपासणी करण्यात आली तर ७७९ लोकांना प्रमाणपत्र दिले आहेत. तुम्हाला मिळालेले प्रमाणपत्र चा वापर सरकारी योजनेचा फायदा घेता यावा यासाठी हे प्रमाणपत्र दिले आहेत. त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले तर पुर्वी च्या उपजिल्हा रूग्णालयात बदल करण्यात आला आहे आता पुढील काळात जनतेला या रूग्णालयाचा फायदा होणार आहे. याच रूग्णालयात २६००० हजार लोकांना कोरोना काळात सेवा दिली असून
शंभर कोटी रूपये वाचले आहेत. सरकार, पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले. महिला, मुले, जळीत विभाग करण्यात येणार आहे. तर दोन उपजिल्हा रूग्णालय हे फक्त कर्जत तालुक्यात च आहेत. उपजिल्हा रूग्णालयाचे विस्तारीकरण व नुतनीकरणाचे
काम थांबून देणार नाही कुणी ही ताकद लावली तरीही काम थांबणार नाही आसा विश्वास यावेळी देवून जनतेच्या आरोग्य सेवेसाठी
फिरता दवाखाना सुरू आहे. अंगावर दुखणे काढू नका . या फिरत्या दवाखान्या मार्फत १ लाख लोकांनी लाभ घेतला आहे तर २५ हजार लोकांचे डोळ्याचे आॅपरेशन केले आहेत. आरोग्य सेवा चांगली असणे आवश्यक असते ती व्यवस्था चांगली निर्माण केली आहे त्यामुळे लोकांना फायदा झाला आहे. भविष्यात उपजिल्हा रूग्णालयात मोठ्या प्रमाणात मशनरी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी शहर अध्यक्ष
विशाल मेहत्रे म्हणाले की, गरीब लोकांचा आरोग्य चा आधार हा सरकारी दवाखाना असून हा आधार भक्कम करण्याचे काम आ. रोहित दादा पवार यांनी केले आहे
कोव्हीड काळात अतिशय सुंदर व चांगले काम रोहित दादा पवार यांनी केले आहे. सरकार बदले निधी अडविला आहे तरीही भांडून निधी आ. पवार यांनीउपलब्ध केला आहे.
तर या वेळी नगरसेवक
सतिश पाटील, बाबासाहेब भिसे, लालासहेब शेळके, देवा खरात, सुनील शेलार, संतोष मेहत्रे, डॉ खरपाडे, राजेंद्र पवार, रवी सुपेकर, प्रहार चे डॉ कोल्हे, सह दिव्यांग लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.