pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; वनसंरक्षक पदी निवड झाल्याबद्दल मोहसीन शेख यांचा सत्कार

Samrudhakarjat
4 6 5 2 9 5

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – भारतीय ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राशीन (ता. कर्जत) येथे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये अत्यंत उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून देशाला मानवंदना देण्यात आली.

राशीनमधील मदिना मकतब फाउंडेशन (परीटवाडी), जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा, श्री जगदंबा विद्यालय, हशु आडवाणी विद्यालय, ग्रामपंचायत राशीन आणि बापूसाहेब देशमुख कार्यकारी सोसायटी अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाचा झेंडा आणि यशाचा गौरव

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राशीन गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मोहसीन जब्बार शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत मोहसीन शेख यांनी घवघवीत यश संपादन करत ‘वनसंरक्षक’ पदी झेप घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मदिना मकतब फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

ग्रामीण भागातील मुलांनी जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे ही गावासाठी अभिमानाची गोष्ट असून, मोहसीन शेख यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker