धाकोजी महाराज विद्यालयाचा २७वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा…

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत निमगाव डाकू सारख्या ग्रामीण भागात विश्वकर्मा ग्रामविकास संस्थेने धाकोजी महाराज विद्यालय सुरू करून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून या परिसरात एकप्रकारे शैक्षणिक क्रांती घडवली असे गौरव उदगार हभप गोविंद महाराज शिंदे यांनी ग्रंथालयाच्या उदघाटन प्रसंगी काढले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वक मा ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक प्रसाद ढोकरीकर हे होते. पुढे बोलताना हभप गोविंद महाराज शिंदे म्हणाले की, गेल्या २७ वर्षापासून धाकोजी महाराज विद्यालयाने आपली गुणवत्ता टिकून ठेवली असून ग्रामीण भाग असतानाही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख
सतत उंचावत ठेवून कला क्रिडा व इतर क्षेत्रात ही विद्यालयाने नावलौकिक कमविला आहे. आज या विद्यालयाचा वर्धापनदिन असून या विद्यालयाने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. यावेळी प्रसिद्ध डॉ संदीप काळदाते, उद्योजक बापूसाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केले धाकोजी महाराज विद्यालयाचा २७वा वर्धापनदिन असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे प्रास्ताविक श्रीपाद आडकर यांनी केले तर आभार प्रार्चाय कय्यूम मोमीन यांनी केले.