ब्रेकिंग
शेततळ्यात बुडून मृत्यू

Samrudhakarjat
4
0
1
9
5
0
कर्जत (प्रतिनिधी) :- शेततळ्यात पडल्याने मृत्यू शेतकऱ्याचा बुडून झाल्याची दुर्घटना कर्जत तालुक्यातील शिंदे येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. शिवाजी बापू घालमे, वय : ५० असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शेततळ्याच्या कागदावरून घसरून पाण्यात पडले. घालमे हे
शेतातील कामासाठी गेले होते. त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी कर्जत पोलिसात तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र वाघ हे करत आहेत.