कायदे क्षेत्रात गौरव: अँड. अभय खेतमाळस यांची प्रतिष्ठित नोटरी पब्लिक पदावर नियुक्ती

कर्जत तालुका वकील संघाचे सदस्य अँड. अभय खेतमाळस यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या अँड. अभय खेतमाळस यांनी आपल्या कार्यकाळात अनेक यशस्वी कामगिरी केली आहे. याआधी ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या कायदेशीर सल्लागार पदावर कार्यरत आहेत.
नोटरी पब्लिक ही एक महत्त्वाची जबाबदारी असून, दस्तऐवजांची वैधता, प्रतिज्ञापत्रे, तसेच अधिकृत करारपत्रांना वैधानिक मान्यता देण्याचे अधिकार नोटरी पब्लिकला असतात. अँड. अभय खेतमाळस यांनी आपल्या प्रामाणिक वकिली व्यवसायाद्वारे समाजात विश्वास निर्माण केला असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही नियुक्ती झाल्याचे मानले जात आहे.
यावेळी अँड. अभय खेतमाळस यांनी सर्वांचे आभार मानले व सांगितले की, “माझ्या कामावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन.”
कर्जत वकील संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम विठ्ठलराव ढेरे यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. युवा नेते दादासाहेब सोनमाळी व मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस यांनीही अँड. अभय खेतमाळस यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.