श्री संत नरहरी महाराजांच्या रजत पादुकांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन !

कर्जत (प्रतिनिधी) :- श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या रजत पादुकांचा दिनांक 16 एप्रिल रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री संत शिरोमणी नरहरी महाराज दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष सचिन कुलथे यांनी दिली.
तालुक्यातील वारकरी पीठ (संत पंढरी,) पिंपळगाव वाघा येथे सदगुरू श्रीकृष्ण कृपांकित श्री डॉ. विकासानंदजी मिसाळ महाराज यांच्या हस्ते दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये श्री गणेश पूजन, पुण्य हवाचन, नंदिग्राम मुख्य देवता स्थापन, रजत पादुकाचल, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी ह. भ. प. कल्याण महाराज, राजेंद्र शहाणे महाराज, धनंजय उदावंत महाराज, मौनानंदजी महाराज,( परभणी) नाथ माऊली जोजारे महाराज, तसेच दुपारी 12 वा. महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कुलथे यांनी केले आहे.