उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती कर्जत येथे भव्य शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा.

कर्जत (प्रतिनिधी) : – केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या तरीही विरोधी पक्ष म्हणतोय पैसा आणणार कोठून? मात्र पैसा आहे. जर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी पैसा वापरला तर विकासासाठी पैसा कुठून आणणार असा असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. कर्जत येथे आयोजित शेतकरी मेळावा, विविध विकासकामांचे उद्घाटन व पक्षप्रवेश समारंभात ते बोलत होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रामभाऊ तुमचे कामच वेगळे आहे. इतर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जेवढे लोक समोर बसलेले असतात तेवढे लोक तुम्ही व्यासपीठावर बसवले आहेत. मी पाठीमागे वळून बोललो तरी इकडे पण एक सभा होईल. येथील सर्व प्रकल्पांची सुरुवात ही राम शिंदे पालकमंत्री असताना झाली होती. ती कामे अडीच वर्षात पूर्ण झाली नाहीत. आपले सरकार आल्यानंतर ही कामे पूर्ण होत आहेत. विकास कामांचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतल.आमदार प्रा. राम शिंदे यांचा जवळचे मित्र असा उल्लेख करून त्यांच्या संघटनकौशल्याचे फडणवीसांनी कौतुक केले.
फडणवीस पुढे म्हणाले, विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोलर फिडर दिले जात आहेत. आगामी काळात हा कार्यक्रम राबवणार असून त्यासाठी सरकारी जमीन फिडरसाठी देणार आहोत. सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांकडून जमीन भाड्याने घेणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक ७५ हजार भाडे देणार असून प्रतिवर्षी ३ टक्के भाडेवाड देणार आहोत. कर्जत- जामखेडमध्ये १०० टक्के सोलर फिडर करा असे आवाहन त्यांनी आ. राम शिंदे यांना केले.
या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण घुले आणि त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांचे तसेच कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे फडणवीस यांनी स्वागत केले.फडणवीस यांनी कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू गोदड महाराज मंदिरास भेट देत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
कर्जत येथील पोलीस अधिकारी -कर्मचाऱ्यांसाठी जामखेड येथे नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण, वीज केंद्राचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या देऊळवाडी (ता.कर्जत) येथील ४००/२२० के.व्ही.केंद्राचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते यावेळी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राम शिंदे, खा. सुजय विखे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, भीमराव धोंडे, मोनिका राजळे यांच्यासह कर्जत- जामखेड तालुक्यातील पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
■ उपमुख्यमंत्र्यांच्या कौतुकासह, प्रवीण घुले यांना पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास दिला
माझे आहे. तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ
कधीच येऊ देणार नाही, हे मी श्री संत सदगुरू गोदड महाराजांना स्मरून सांगतो, असा विश्वास आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कर्जत येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आ. शिंदे बोलत होते.