मिरजगाव पोलिसांच्या मदतीने काही वेळातच हरवलेल्या मुलांचा शोध.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- बुधवार दिनांक 16/8/2023. रोजी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राजकुमार साकेत सतना मध्य प्रदेश हे आपल्या तीन वर्षाच्या मुलगा निकीत साकेत यास कुत्रा चावल्याने त्यास लस देण्यासाठी घेऊन आले असता व प्राथमिक आरोग्य केंद्र मिरजगाव येथून त्याचा मुलगा हरवला कसलाही विलंब न करता राजकुमार साकेत याने मिरजगाव पोलीस स्टेशन कडे धाव घेत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली लगेचच मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे साहेबांनी सदर घटनेचे गांभीर्य पाहता यांनी कसलाही विलंब न करता यांनी पोलिसअंमलदार वैभव सुपेकर यांना कळवून तातडीने सदर मुलाचा शोध त्वरित घ्या असा आदेश मिळतात वैभव सुपेकर यांनी मिरजगाव शहरातील काही पोलीस मित्र यांना फोन करून सदर कामात मदत करण्याबाबत सांगितले असता, त्यावेळी पोलीस मित्र पृथ्वीराज पलगे, अक्षय माने, विनोद तिखाेने, सुजित घोगरे, आनंद चौकटे, सुनील सूर्यवंशी, विशाल जंगम यांनी त्या हरवलेल्या मुलांचा शोध चालू केला असता सदर मुलगा हा मिरजगाव येथील इलाजी चौक येथे दिसून आला त्यास पोलीस मित्रांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये सोबत घेऊन येऊन पोलीस मित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली व सदर हरवलेल्या मुलास पाेलिस स्टेशन येथे आणून त्यास वडील राजकुमार साकेत यांच्या स्वाधीन केले. हरवलेल्या मुलाच्या तात्काळ शोध प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक सोमनाथ दिवटे व त्यांच्या टीमचे मिरजगाव परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.