भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी ॲड. धनराज रानमाळ-राणे यांची नियुक्ती

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिली व्यवसाय करणाऱ्यांना अनेकांना नोटरी पदाची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार ६४८ वकिलांची नोटरी म्हणून केंद्र सरकारने गुरुवारी (ता.१४) रात्री नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढ्या संख्येने एकाच वेळी नोटरी पदी नियुक्ती होण्याचा हा उच्चांकच म्हणाव लागेल. वकील वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यामध्ये कर्जत तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध वकिल ॲड. धनराज रानमाळ-राणे यांचीही भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती झाली आहे. ॲड. रानमाळ हे कर्जत न्यायालयात गेल्या पंधरा वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. ते रुक्मिणी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्विटास फायनान्स बँक अशा विविध बँकांचे आणि कंपन्यांचे कायदेशिर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून वकील यांना ओळखले जाते. ते कायदेशीर व्यावसायिक आहेत. काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.
वकिली व्यवसायात पदार्पण केल्या नंतर १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या. मुलाखती देलेल्या जवळपास सर्व वकिलांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. असे ॲड. रानमाळ -राणे यांनी सांगितले.
रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे आवश्यकती तिकीटे लावावी लागतात.
कर्जत तालुका न्यायालयातील ॲड. राणे यांच्यासह ॲड. बाळासाहेब शिंदे, ॲड.बाळासाहेब बागल ॲड. कदम, ॲड. टकले, ॲड . वाकडे, ॲड. पुराणे, ॲड. शेख, ॲड. राऊत, ॲड. नेवसे, ॲड. शिंगटे, ॲड. मेहत्रे, ॲड. खेतमाळस, ॲड. रसाळ, ॲड. रगडे, ॲड. गायकवाड, ॲड. पिसे, ॲड. मोगल व ॲड. आशा मेहेत्रे यांचीही भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती झाली आहे.