प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कर्जत-जामखेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण – सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे – ना. प्रा. राम शिंदे

महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी घरकुल लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे व राज्य शासनाने राबवलेल्या या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात घरकुल बांधकाम साहित्य, बांधकाम प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पूर्ण केल्यास योजनेची उद्दिष्टे लवकर साध्य होतील आणि इतर पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या स्वप्नातील घरासाठी राज्य शासनाच्या अभियानाच्या यशासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषद सभापती ना. प्रा. राम शिंदे साहेब यांनी केले आहे.
महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत कर्जत-जामखेड तालुक्यातील एकूण 10,072 मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरित केली जाणार आहेत. यामध्ये 7,489 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
कर्जत तालुक्यातील एकूण उद्दिष्ट: 6,258 लाभार्थी
मंजुरी पत्र प्राप्त लाभार्थी: 6,123
जामखेड तालुक्यातील एकूण उद्दिष्ट: 4,088 लाभार्थी
मंजुरी पत्र प्राप्त लाभार्थी: 3,949
ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांना आमंत्रित करून त्यांचे स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर मंजुरी पत्रांचे वितरण होईल.
राज्य शासनाच्या वतीने एकूण 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात येणार असून, किमान 10 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4:35 वाजता करण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली किमान 100 लाभार्थ्यांची ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्प्यानुसार निधी वाटप प्रक्रिया, बांधकाम साहित्याची उपलब्धता, घरकुल बांधकाम आराखडा यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर मंजुरी पत्रांचे वाटप होईल आणि काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य शासन महाआवास अभियान योजना 2024-25 युद्धपातळीवर राबवून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून घरकुल संदर्भात आवश्यक माहिती घ्यावी. तसेच, लवकरच शासन लाभार्थी निवडीसाठी सर्वेक्षण करणार असून, त्या संदर्भातील निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.