
कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात बाजी मारली असून अ ++ श्रेणी प्राप्त करीत असताना ३.७१ सीजीपीए घेऊन भारतात सहावा क्रमांक तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालय यावर्षी हीरक महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मिळालेले हे यश कौतुकापद असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांनी केले. तसेच सहसचिव डॉ. ज्ञानदेव मस्के, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयाने विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, कर्जत -जामखेडचे आमदार मा. रोहित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व सर्व सदस्य, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना, कर्जत नगरपंचायत, कर्जत तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब कर्जत, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, नॅक समन्वयक डॉ. संदीप पै नॅक सहाय्यक डॉ. संतोष घंगाळे व सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दादा पाटील महाविद्यालयाला नॅकच्या चौथ्या फेरीच्या मूल्यांकनासाठी दिनांक १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी नॅक चेअरमन म्हणून उत्तराखंड येथील एच. एन. गढवाल विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. देवेंद्रसिंग नेगी, प्रमुख समन्वयक म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणाचे प्राध्यापक डॉ. संजीव कुमार व सदस्य म्हणून केरळ येथील इव्हेनियस कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के. आय. जॉर्जी या नॅक पिअर टीमने भेट देऊन नॅक मूल्यांकनात
महाविद्यालयाचे बदललेले स्वरूप व गुणात्मक दर्जा याची तपासणी करताना तज्ञ समितीने महाविद्यालयात राबवल्या गेलेल्या बोलकी झाडे, आयडियाचा आविष्कार, तेजस्विनी महोत्सव, रयत परा मिलिटरी विभाग, एन.सी.सी, एन.एस.एस, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, फॅशन डिझाइनिंग, योगा व
मेडिटेशन, ब्युटी अँड वेलनेस, उपहारगृह, लेकीचे झाड उपक्रमातील सहभाग, विद्यार्थ्यांना सर्व थरातून केली जाणारी मदत, देखण्या व सुसज्ज इमारती, शारदाबाई पवार सभागृह, इंडोर स्टेडिअम, सायन्स लॅब, ईटीपी प्लॅन, गांडूळ खत प्रकल्प, मुलींचे वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालय, आदि विविध विभाग तसेच सामाजिक विस्तार कार्य, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमातील सहभाग अशा विविध उपक्रमांचे कौतुक करून महाविद्यालयाचे मूल्यमापन केले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. संदीप पै, सहसमन्वयक डॉ. संतोष घंगाळे तसेच क्रायटेरिया प्रमुख डॉ. अशोक मस्के, डॉ. आनंद हिप्परकर, डॉ. महेश भदाणे, डॉ. प्रतिष्ठा नागणे, डॉ. अजित इंगळे, डॉ. माधुरी गुळवे, डॉ. अशोक पिसे, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, कार्यालयीन प्रमुख श्री. विलास मोढळे, श्री रमेश जाधव, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख डॉ. संजय चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. कैलास रोडगे, डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महारनवर, जिमखाना प्रमुख डॉ. संतोष भुजबळ, तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी नॅककरिता अथक परिश्रम घेतले.
महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर,नॅक समन्वयक डॉ. संदीप पै, नॅक सहाय्यक डॉ. संतोष घंगाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी आदिंनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालांचे उधळण करत आनंद साजरा केला.