कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन विजयी उमेदवारांचे राशीन येथे शाहूराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने सत्कार

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत च्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार व शेतकरी विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून विजयी उमेदवार राम कानगुडे, तसेच सोसायटी मधून संग्राम पाटील, गुलाब तनपुरे, यांचा शाहूराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शाहूराजे म्हणाले. सध्या देशात व राज्यात सत्तेत असलेल्या प्रस्थापित अनेक नेत्यांच्या विरोधात संघर्ष करीत आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड दोन्ही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत समसमान(9, 9,) उमेदवार निवडून आल्यामुळे अनेक दिग्गजांना पवार पॅटर्नचा राजकीय खेळीचा झटका बसला असून अनेकांच्या भवया उंचावले आहेत.या निवडणुकीत तालुक्यातील अनेक दिग्गजांचे लक्ष असलेले राम कानगुडे यांच्या पाठीशी खंबीर साथ देत किंगमेकर ची भूमिका पार पाडत विजय खेचून आणण्याकरिता आमदार रोहित पवार यांच्यासोबत सत्तेची गणिते जुळवण्यास श्याम कानगुडे यांचा सिंहाचा वाटा आहे
असे शाहूराजे भोसले यांनी बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते श्याम कानगुडे , विजय माेढळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, प्रसाद मैड, अमोल कुलथे. पांडुरंग भंडारे, तात्या माने, संजय ढगे, संतोष सरोदे, मनोज बोरा, बापू सौताडे, भास्कर मोढळे, किशोर कानगुडे, माऊली कानगुडे नितीन कानगुडे , पवन जांभळकर, संतोष ढावरे, राजेंद्र ढावरे, पप्पू भाकरे, प्रवीण आंधळकर, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.