शंभू ऑईल मिल चे लाकडी घाणा तेल व ऑरगॅनिक गूळ भिमथडी जत्रेत

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील तनपुरे फॉर्म संचलित शंभू ऑईल मिल व ऑरगॅनिक गूळ कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था संलग्न महिला स्वयंसहाय्यता समूह निर्मित आ.रोहीत दादा पवार यांच्या मातोश्री सुनंदा ताई पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित भिमथडी जत्रा येथे ९४ नंबर स्टॉल वर उपलब्ध असून पुणेकरांनी या उत्पादनास मोठी पसंती दर्शवली आहे.आपल्या क्वालिटी उत्पादनामुळे तालुक्यात अग्रभागी राहिल्यानंतर शंभू ऑईल मिल ची उत्पादने आता भीमथडी जत्रा येथे ग्राहकांसाठी सज्ज असून तेथे ग्राहकांच्या मोठी पसंदीस उतरली आहेत.
शुद्ध लाकडी घाणा निर्मित व दर्जदार लाकडी घाण्याचे करडई , सुर्यफुल,शेंगदाणा,मोहरी , खोबरे,तीळ,बदाम, जवस आदी क्वालिटी उत्पादने पुणेकरांच्या मोठ्या पसंतीस उतरली असून ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे.ही भीमथडी जत्रा २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर , अग्रिकल्चर ग्राउंड , शिवाजीनगर , पुणे येथे सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत सुरू राहणार आहे.