राशीन येथे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व नाफेडच्या वतीने चना डाळ विक्री सुरू.

कर्जत (प्रतिनिधी) :- राशिन ता कर्जत जिल्हा अहमदनगर दि.१५/१०/२०२३ राशीन येथे भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आणि नाफेडणे साठ रूपये किलो दराने नागरिकांसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळीच्या नावाने मा मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या चना डाळ वाटपाचा शुभारंभ मा मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष मा.श्री शेखर खरमरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे कर्जत शहराध्यक्ष श्री गणेश क्षिरसागर,श्री.विक्रमराजे राजेभोसले,श्री.पांडुशेठ भंडारे,श्री.श्री.दत्ताआबा गोसावी,श्री.एकनाथ बापू धोंडे,श्री.तात्यासाहेब माने,श्री.सुनील काळे, शोयबकाका काझी,एड.हरिश्चंद्र राऊत साहेब,एड सचिन रेणुकर,श्री.योगेश शर्मा,श्री.संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या धोरणानुसार प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ वंचित शोषित गरिबांच्या थेट घरापर्यंत पोहोचावा याच दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे व या उपक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री खरमरे यांनी केले.