
Samrudhakarjat
4
0
1
9
1
2
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक नजीकच्या तलावात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस जवान वाघ, सरोदे हे घटनास्थळी दाखल झाले.
हा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल. काही दिवसांपासून मृतदेह हा पाण्यातच आहे. मृतदेह काही प्रमाणात सडलेला असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. तलावावरील विजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांला हा मृतदेह आढळून आला. त्याची माहिती गावात देण्यात आली.
कर्जत पोलिसांची माहिती: राक्षसवाडी बुद्रुक गावाचे शिवारात एक 45 ते 50 वयोगटातील पुरुष जातींचे प्रेत तळ्यात सापडले आहे. त्याच्या अंगावर टी शर्ट असून तो धालवडी गावातील विकास होळकर यांनी छापलेले दिसत आहे.
मृतदेहाची ओळख पटल्यास तात्काळ कर्जत पोलिसांना 02489222333 या नंबरवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.