चिलवडी गावातील बेकायदेशीररित्या हडपलेली जमीन परत मिळाण्यासाठी सुरेश बेद्रे व रुक्मिणीबाई चव्हाण कुटुंबीयांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील चिलवडी गावात सुरेश दादा बेद्रे यांची वडिलोपार्जित असणारी जमीन जुना सर्वे नंबर १५९ चिलवडी येथील तसेच
२) जुना सर्वे नंबर १६१व १२४ वारसाचे ७×१२ दप्तरी नोंद करून मिळावी अन्यथा सुरेश दादा बेद्रे व चव्हाण यांनी कर्जत येथील प्रांत कार्यालयासमोर दि. २०/७/२०२३. रोजी सकाळी १०.वाजता. आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सुरेश दादा बेद्रे हे चिलवडी गावचे रहिवासी असून कुटुंब उपजीविकेसाठी सध्या ते पुणे येथे राहत आहे, माझी वडिलोपार्जित जमीन जुने सर्वे नंबर १६१,१५९,१२४, अशा नोंदीने होत्या परंतु काही दिवस मी कुटुंबासोबत बाहेरगावी पोट भरण्यासाठी गेलो असता वर नमूद केलेल्या जुन्या सर्वे नंबर जमिनीचे आमच्या अनुपस्थितीत बोगस रित्या फेरफार करून आमच्या वाड वडिलांचे काहीही जमिनी विकले बाबातचे सबळ पुरावे नसताना जमिनी हस्तांतरित केले आहे .सदर जमिनीचे वारस आज रोजी आम्हीच आहोत तसे जुने सर्वे नंबर ७×१२, फेर, सर्वे नंबर, स्कीम उतारे, व इतर प्रबळ पुरावे सुरेश दादा बेंद्रे व रुक्मिणीबाई भगवान चव्हान यांच्याकडे आहेत आपण सुद्धा जमिनीचा कागदपत्री पाठवा करून चौकशी होऊन ७×१२ दप्तरी माझे व रुक्मिणीबाई चव्हाण वारसाने नोंदी करण्याचे आदेश मिळण्यासाठी दि.
२७/३/२०२३ रोजी मी आपणाला रजिस्टर प्रमाणे अर्ज पाठवलेला आहे परंतु त्या अर्जाचे लेखी उत्तर मला मिळालेले नाही किंवा तुमच्या ऑफिसचे मला लेखी पत्र देखील चौकशी बाबत मिळाले नाही असो. वरील माझे जुने सर्वे नं. १५९,१६१,१२४ या जमिनींच्या ७×१२. दप्तरी माझे व रुक्मिणीबाई भगवान चव्हाण यांच्या वारसाने नोंदीचा आदेश मिळे पर्यंत बेद्रे व चव्हाण कुटुंबासमवेत दि. २०/७/२०२३ रोजी कर्जत प्रांत कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता अमरण उपोषणास बसणार आहे. आमच्या वर जमिनी बाबतीत झालेल्या अन्यायाचा पूर्ण विचार करून शासन जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आमचे दोन्ही कुटुंबाचे आमरण उपोषण चालू राहील याची शासन दप्तरी नोंद घ्यावी व आमच्या उपोषण दरम्यान व पुढे काहीही अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वतोपरी संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे देखील बेंद्रे व चव्हाण कुटुंबाकडून बोलले जात आहे. या संबंधित उपोषणाबाबत. तहसीलदार साहेब कर्जत, पोलीस स्टेशन कर्जत, मंडल अधिकारी साहेब राशिन, कामगार तलाठी चिलवडी यांना उपोषणाचे निवेदन देण्यात आले आहे.