pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग
Trending

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पा.यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला कर्जत तालुक्यातुन सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा

Samrudhakarjat
4 6 6 4 3 4

कर्जत (प्रतिनिधी) :- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध केला.त्यास सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने पाठींबा देत मंगळवारी कर्जत शहरासह तालुक्यात बंद ठेवण्यात आला. कर्जत येथे रास्ता रोको आंदोलन केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबाबत निषेध मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तीव्र भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास सकल मराठा समाज पाठींबा दर्शवत असून दोन्ही आमदारांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देत आरक्षणासाठी मराठा समाजाच्या बांधवासोबत असल्याच दाखवावे अशी मागणी केली.तसेच आंदोलन ठिकाणी सकल मराठा समाजाने सुरू आंदोलन, रस्ता रोकोसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा दिला.

यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक वैभव लाळगे, अंबादास पिसाळ, श्रीहर्ष शेवाळे, शिवाजी फाळके, सुनील शेलार, उज्वला शेळके, विशाल मेहेत्रे, गंगाधर बोरुडे, राहुल नवले, गजेंद्र यादव, संपत पवार आदींची भाषणे झाली. रास्ता रोको दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या रास्तारोको आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker