सहाय्यक अभियंता व ठेकेदार यांच्या लेखी आश्वासनानंतर परीट वाडीकरांचा रास्ता रोको मागे.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन परीटवाडी मोहिते वस्ती जिल्हा हद्द रस्त्याचे डांबरीकरणाचे काम माननीय आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून २९२ .०० लक्ष रुपये निधी वर्षापूर्वी मंजूर झाला असून या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन शुभारंभ होऊन देखील अध्याप या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे व कामाचा मुदत कालावधी संपत आल्यामुळे परीट वाडीचे सरपंच विलास काळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवार दिनांक ६.३.२०२३ आज होणारे रास्ता रोको आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग श्रेणी १ अधिकारी वाकचौरे व कॉन्ट्रॅक्टर लाळगे दिलेल्या लेखी आश्वासन नंतर भिगवण चौक राशीन येथे होणारे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सहाय्यक अभियंता वाघचौरे यांनी महिन्याच्या आत तर ठेकेदार यांनी परीट वाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विलास नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले रास्ता रोको धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भाजपा महाराष्ट्र भटक्या विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे , बंटी कदम, शिवाजी काळे, जालिंदर वाघ, गोरख वाघ, किरण काळे ,भीमराव काळे, सुनील त्रंबके, संकेत पाटील, शंकर काळे ,धनाजी पवार, किरण गवळी ,बबन जाधव, साधू गवळी ,बाळू काळे, बापू काळे, संतोष वाघ , अवधूत काळे, सद्दाम काझी (pwd)कर्मचारी शकील भाई शेख व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.