आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

कर्जत जामखेड :- कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे २५/१०/२०२४ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे.
सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून शुक्रवार दि.२५, ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेनंतर २२७- कर्जत – जामखेड ” जिल्हा अहिल्यानगर या मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता, सामान्य व्यक्तीच्या व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थित उमेदवारी अर्ज भरून, आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी नोंद घ्यावी व उपस्थित रहावे ही विनंती, असे आमदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.