रमाई आवास योजनेच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार ; नगरसेवक भास्कर भैलुमे
महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- मानवाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा आहेत,असे सांगितले जाते. आजही भारत देशात अनेक लोक या मूलभूत गरजा पासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना योग्य प्रकारे पोहचल्या का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या देशात अनेक जाती-जमाती या मूलभूत गरजापासून वंचित असल्याच्या दिसतात. त्यांना शासनाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या,परंतु त्या काहीशा प्रमाणात यशस्वी झाल्या असल्याच्या दिसतात तर अनेक योजना अपयशी होताना दिसत आहेत. शासनाने अनुसूचित जातीच्या लोकांना चांगली घरे मिळावीत यासाठी रमाई आवास घरकुल योजना आणली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लोकांना घरकुले मंजूर करण्यात आली. सुरुवातीला सुरळीतपणे चालणारी ही योजना अधिकारी वर्गाच्या मनमानी मुळे व शासनाच्या जाचक अटी मुळे गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीतून जात आहे. कर्जत शहरातील सुमारे 267 घरकुलाना निधी उपलब्ध आहे फक्त बांधकाम परवानगी अभावी घरकुले रखडली आहेत. सध्या पावसाळा जवळ येत असल्याने अनेक लाभार्थ्यांची घरे ढासळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे रमाई आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध असताना जाणुन बुजुन अधिकारी वर्ग लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम करत आहे.या बाबतीत समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भागे यांची त्यांच्या कार्यालयात नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी भेट घेऊन या विषयाची अडचण त्यांच्या लश्रात आणुन दिली .
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल योजना अत्यंत महत्वाकांक्षी असताना अधिकारी वर्ग जाणुन बुजुन या मागासवर्गीय योजने कडे दुर्लक्ष करत आहे
गेल्या 7 वर्षापासून रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे त्यात गेली 2 वर्ष कर्जत नगरपंचायतीत निधी पडुन आहे.
सध्या घरकुल लाभार्थी आज ना उद्या घर मिळेल या आशेवर मोडक्या तोडक्या घरात दिवस काढत आहेत. संध्या त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात त्यांची घरे कधी पडतील हे सांगता येत नसल्याचे नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी सांगीतले सध्या ते भविष्यात घर मिळेल या आशेवर दिवस काढत आहेत. सध्या पाऊसाळा जवळ आला असल्याने त्याच्या घराची पडझड झाली आहे. त्यामुळे त्या लाभार्थी चा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकुलासाठी लागणारी राहिलेली सर्व कागदपतत्रे ही दिली आहेत. पण प्रशासनाकडून मंजूर घरकुलाना बांधकाम परवानगी नसल्याचे सांगण्यात येत आहे .त्या सर्व लाभार्थ्यांची घरकुले मंजूर झाली असून शासनाने यासाठी निधी पण कर्जत नगरपंचायत कडे वर्ग आहे केला आहे .
कर्जत नगरपंचायती चे नगरसेवक भास्कर भैलुमे हे गेली 7 वर्षापासुन हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न शिल आहेत तरी देखील फक्त अधिकारी वर्गाच्या ना करते पणामुळे आज पर्यंत ही योजना पैसे असुनही प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न अधिकारी वर्गाकडुन करण्यात आला नाही.
कर्जत शहरात समाज कल्याण विभागाकडून गेल्या दोन वर्षात रमाई आवास घरकुल योजनेचा एकही रुपया निधी खर्च केला गेलेला नाही. सातत्याने आम्ही समाज कल्याण विभागाकडे पाठपुरावा करत असून ही
कर्जत नगरपंचायती ला जे घरकुलाचे टार्गेट प्राप्त झाले होते. त्यानुसार कर्जत नगरपंचायतीला समाज कल्याण विभागाकडुन पैसे ही मिळाले आहेत तरी देखील फक्त बांधकाम परवानगी अभावी आजुन घरकुलाचे स्वप्न स्वप्न राहिले आहे.
यासाठी सातत्याने आमदार रोहित पवार आणि समाज कल्याण साह्यक आयुक्त अहमदनगर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच होता . या योजनाचे स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार याचे वेळो वेळी मार्गदर्शन लाभले त्यानी हि या संदर्भात प्रत्येक वेळी या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मोलाची मदत केली असल्याचे भास्कर भैलुमे यांनी सांगीतले . रमाई आवास घरकुल योजना ही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आणि कर्जत नगर पंचायतीने ही योजना दलित वस्त्यांमध्ये प्रभावीपणे राबविणे आवश्यक होते. परंतु शासन,प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले . शासनाने या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात-लवकर निर्णय घेऊन या लाभार्थी ना लवकरात लवकर त्याच्या बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा करू असे अश्वासन सामाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी दिले. या साठी आमदार रोहित पवार यांनी