खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून राशीन मक्का मस्जिद कब्रस्तान संरक्षणभिंत बांधकामासाठी १० लाखाचा निधी मंजूर भूमिपूजन कामाचा शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी ):- जावेद काझी .माननीय कार्यक्षम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून आ. प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने , भाजपा ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी यांच्या अथक परिश्रमातून, ग्रामपंचायत राशीन जन सुविधा अंतर्गत सहकार्यातून काझी गल्ली राशीन येथील मक्का मस्जिद कब्रस्तांच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी १० लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या भूमिपूजन कामाचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ.नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते राजकुमार आंधळकर,ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार सायकर, युवक नेते भीमराव साळवे, कॉन्ट्रॅक्टर सल्लाउद्दीन काझी, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, उद्योजक माऊली धोंडे, अतिश घोडके, भाजपा राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे, पिंटू शर्मा, गोवर्धन ननवरे, मोहम्मद पठाण, ताजुद्दीन काझी, जेके मोटर्स चे जाकीर भाई काझी, भाजपा राशीन शहराध्यक्ष जमीर काझी, वसीम सर, शरीफ काझी, मुक्तार भाई काझी, अब्बास काझी, इकबाल शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सद्दाम काझी, बाबा शेख .खालीद मेजर, मोहसीन काझी, अल्ताफ भाई शेख, मुजम्मिल शेख,औ वसीम काझी, अरबाज काझी, अल्ताफ शेख, शाकीर शेख, अल्ताफ बाई काझी, निहाल काझी, इस्माईल शेख, व इतर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला च मक्का मस्जिद काझी गल्ली येथील कब्रस्तांनच्या संरक्षण भिंती साठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे भाजपा युवा प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष साहिल काझी यांनी अभिनंदन व्यक्त करीत आभार मानले.