राशीन मध्ये काझी गल्ली येथे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .काल दुपारी चार ते पाच च्या दरम्यान सुमारे तासभर राशिन सह परिसरात वादळ वाऱ्यासहित विजांच्या कडकडाडी सह दमदार अवकाळी पावसाचे आगमन झाले. या पावसा च्या साठलेल्या पाण्यामुळे काझी गल्लीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोरील रस्त्यालगत योग्य रित्या गटारीचे निचऱ्याचे नियोजन राशिन ग्रामपंचायतीच्या वतीने न झाल्यामुळे गटारीचे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी या पावसाच्या पाण्यात मिश्रित झाल्यामुळे काझी
गल्ली, कुंभारवाडा, माळवाडी, भागातील लोकांचे जनजीवन विस्कळित झाले असून तेथील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत आहे. वेळोवेळी सूचना देऊन देखील राशीन ग्रामपंचायत कडून तुंबलेल्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन अद्याप देखील करण्यात आलेले नाही. तरी ग्रामविकास अधिकारी कापरे यांनी समक्ष पाहणी करून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वारंवार साठत असलेल्या दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपाचे अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष साहिल काझी व इतर रहिवासी व नागरिकांनी दिला आहे.