गृहिणी महिलांना घरबसल्या रोजगाराची मोठी संधी ; सुनंदा ताई पवार

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत जामखेड तालुक्यातील महिलांसाठी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मंगळवार कार्यक्रम घेण्यात आला कर्जत तालुक्यातील सर्व गरजू महिलांसाठी घरबसल्या पापड लाटून देण्याचे जवळपास 3000 महिलांना हाताला काम हवे आहे अशी महिलांची मागणी होती त्या नुसार आमदार रोहित पवार यांनी श्री गणेश महिला उद्योग समूहाचे राजेश डोंगरे यांच्याशी संपर्क करून हा एक प्रोजेक्ट तालुकास्तरावरती आणलेला आहे. महिन्याला २५ टन पापड श्री गणेश महिला पापड गृह उद्योग कंपनीस पुरवायचे आहेत, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गट व गरजू व इच्छुक महिलांसाठी हे काम देऊन महिलांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे ,महिलांना त्यांच्या क्षमतेनुसार व मागणीनुसार पापडचे पीठ दिले जाईल महिलांनी दिलेल्या पिठामधून कंपनीच्या नियमाप्रमाणे पापड तयार करून पुन्हा कंपनीला जमा करायचे, सर्व तालुक्यातील पीठ व पापड पॅकिंग , वजन व मार्केटिंग याचं एकत्रित काम तसेच पीठ तयार करून मसाला मिक्स करून सर्व इतर प्रोसेस करण्याचे काम कर्जत मध्ये एक सेंटर होणार असून तेथून नियोजन सुरू राहणार आहे ,अशी माहिती कंपनीचे श्री गणेश पापड कंपनीचे प्रमुख राजेश डोंगरे यांनी सांगितले,
कार्यक्रमा वेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाले की महिलांची नेहमी मागणी असायची की आम्ही तयार केलेला माल मार्केटमध्ये विकायचे म्हणलं तर खूप अडचणी येत असतात ,त्यामुळे आम्हाला घरबसल्या कंपनीचे काम काही असेल तर ते मिळावे आम्हाला कोणत्याही कंपनीचे घरबसल्या काम मिळाले तर बरे होईल, त्या दृष्टीने आम्हाला असे काम पाहिजे आहे, या मागणीचा विचार करून आम्ही काही कंपनीशी चर्चा केली, व त्यानुसार श्री गणेश पापड यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज सर्व महिलांच्या समोर त्यांना बोलावून सर्व माहिती देण्यास सांगितले होते, तसेच या सर्व कामाची सुरुवात होण्यापूर्वी महिलांची पाच पाच दिवसाची प्रशिक्षण घेतली जाणार असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांकडे
क्वालिटी व क्वांटिटी याचा विचार करून पुढील कामाचे नियोजन दिले जाणार आहे त्यानुसार त्या कामाचा मोबदला देणार असून प्रशिक्षणाच्या वेळी कंपनी महिलांशी त्या बाबत सविस्तर चर्चा करणार आहे, यापुढील काळामध्ये अजून वेगवेगळ्या कंपनीशी संपर्क साधून अजून महिलांना नाविन्यपूर्ण काम व उपक्रम राबविण्यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत, प्रत्येक महिला ही आर्थकदृष्टया स्वावलंबी झालीच पाहिजे, त्यासाठी
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे माध्यमातून तसेच आमदार रोहित पवार याचे प्रयत्न चालू आहेत
यावेळी कंपनीच्या महिला प्रतिनिधी यांनी उद्योग निर्मितीसाठी आवश्यक असणारे कौशल्य भाग भांडवल उपलब्धता. उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, लेबलिंग तसेच बाजारपेठ उपलब्धता याबाबत सखोल मार्गदर्शन करून महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
उपस्थित महिलांना स्वयंरोजगार निर्मितीबाबत . श्री गणेश महिला पापड गृहउद्योग समूहाचे प्रमुख राजेंद्र डोंगरे. लक्ष्मी बंडगर, संगीता हरवाळकर ,मैना चौगुले ,सुनिता खांडेकर,
यांनी महिलांना प्रात्यक्षिके दाखवून सर्व माहिती दिली. शिबिरास कर्जत तालुक्यातील शेकडो महिलांनी उस्फूर्तपणे उपस्थित राहून सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती सुर्वे, सूत्रसंचालन मा. बाळासाहेब नगरे, यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेची सर्व अधिकारी व शारदा महिला संघ सर्व टीम आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.