राशिन येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन ता. कर्जत येथे ईद -उल अजहा(बकरी ईद) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर्व मुस्लिम समाज बांधव ईदची नमाज पडण्यासाठी जामा मस्जिद मरकस येथे एकत्रित होऊन सकाळी ७.३० वाजता धार्मिक विधी पूर्ण करीत ईदगाह कडे रवाना झाले. ईदगाह मैदानात मौलाना हाफीज रहीम शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना कुर्बानी करणे बाबत माहिती दिली.
त्यानंतर ८.१५ वाजता बकरी ईद नमाज चे पठण मौलाना हाफिज रहीम शेख यांनी केले. यादरम्यान द्वेष मुक्त करीत आपसी भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी अल्लाहकडे दुवा करण्यात आली.
तसेच खुदबा चे पठण करीत बकरी ईद ची नमाज पूर्ण करण्यात आली. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट करीत ईदचा आनंद व्यक्त करीत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. या दरम्यान राशीन दूरक्षेत्र चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, हेडकॉन्स्टेबल काळे, व इतर सहकाऱ्यां कडून चोक बंदोबस्त ठेवत गळाभेट करीत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.