चाललंय काय : अवैध वाळू उपसाही जोरात, महसुलविभागाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष कोणी उपसतयं मुरूम, तर कोणाची वीटभट्टी… माफियांना कोणाचा धाक ?.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून अवैध वीटभट्टीची माती, अवैध मुरूम व वाळू उपसाही केला जात आहे. त्यामुळे हे माफियांना कर्जत तालुका आंदण दिला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राशीन परिसरातील काळेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात वीट भट्टी साठी लाणगा-या मातीचे अवैधरित्या उत्खनन करुन ही माती दुरगाव येथील वीटभट्टी साठी महसूल विभागाच्या वरदहस्ताने नेली जात आहे.
वीट भट्टी ची माती मंडल अधिकारी कार्यालया समोरुन विना राॅयल्टि ची जोमाने वाहतूक सुरळीत सुरू आहे. तरीही तलाठी व मंडळ अधिकारी अर्थ पुर्ण व्यवाहारा मुळे कारवाई करीत नाहीत. ही बाब तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितली असता लगेच पथक पाठवून कारवाई करण्यात येईल असे सांगितले तरीही पाच दिवस उलटून गेले तरी ही या अवैधरित्या वीट भट्टी माती उत्खनन करणा-या इसमावर कारवाई केली नाही.मंडल अधिकारी प्रकाश कुंदेकर यांना याबाबत माहिती देवून विचारणा केली असता. तहसील कार्यालयाने वीट भट्टीच्या माती ची परवानगी दिलेली नाही त्यामुळे वीट भट्टी घ्या मातीची वाहतूक ही अनाधिकृत व बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याने तलाठी प्रशांत गोंडचर यांना सर्व वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तलाठी प्रशांत गोंडचर यांनी कारवाई केली आहे असे सांगून तलाठी प्रशांत गोंडचर यांच्या शी संपर्क साधावा असे सांगितले.तर तलाठी प्रशांत गोंडचर यांच्या शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तलाठी प्रशांत गोंडचर यांनी अनेक वेळा फोन उचलला नाही., दरम्यान या भागात गेल्या अनेक दिवसांपासून गौणखनिज उत्खनन केले जात आहे. मात्र याकडे तलाठी प्रशांत गोंडचर व मंडळ अधिकारी प्रकाश कुंदेकर हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. राशीन परिसरातील राजरोस सुरू असलेला माफियांचा हस्तक्षेप रोखणार तरी कधी? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
राजरोसपणे येथील गौणखनिज उपसा कसा काय करतात, त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.