Advertisement
ब्रेकिंग

जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळावा

Samrudhakarjat
4 0 1 3 2 4

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- आज दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण विकास केंद्र संचलित व टोल ग्रुप पुणे, कोरो, इंडिया मुंबई व csrd कॉलेज आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळावा सिद्धार्थ वसतिगृह, कर्जत येथे पार पडला. हा प्रबोधन मेळावा मुमताजताई शेख कोरो इंडिया मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य प्रा.विक्रम कांबळे सर यांनी आजच्या युगातील स्त्री आणि आजची परिस्थिती यावर महिलांना प्रबोधन केले.प्रा.कांबळे बोलताना म्हणाले की, ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे काम कौतुकास्पद असून समाजातील अनाथ, निराधार, एकल महिलांना, अनाथ बालके,अत्याचार ग्रस्त महिला, भटके विमुक्त, आदिवासी समाजातील प्रत्येक तळागाळातील लोकांनपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचविण्याचे काम करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहे. तसेच महिलांना अंधश्रद्धा न पाळता सत्यशोधक पद्धतीने जगणे गरजेचे आहे .

तसेच महिला व बालकल्याण समिती, कर्जतचे मा.अमोल मिटकरी यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची उपस्थित महिलांना माहिती दिली. एकल महिलांनी न डगमुकता पुढे येऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे सांगितले.यानंतर

  यानंतर अध्यक्षीय भाषणाच्या वेळी मुमताज ताई शेख यांनी महिलांना संविधानामध्ये आपले स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कोणीही खचून न जाता तसेच अंधश्रद्धा बळी पडू नये. सामाजिक प्रवाहात येऊन आलेल्या अडचणी मात करत संस्थेशी जोडून हक्क व अधिकारासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हक्क व अधिकार दिलेले आहे. या पद्धतीने आपण वागले पाहिजेत. लोकांमध्ये स्त्री-पुरुष विषमता आहे. ती महिलांनी मानू नये पुरुषांना जेवढे स्थान आहे तेवढेच स्थान महिलांना आहे.

यानंतर ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिव उमाताई जाधव यांनी महिलांनी आपले आरोग्यवर व्यवस्थित लक्ष दिले पाहिजेत. महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्न सतत असतात परंतु महिलांनी पुढे येऊन महिलांचे संघटन किती महत्त्वाचे आहे. महिलांवरती अन्याय अत्याचार होत असल्यास महिलांचे संघटन किती महत्त्वाचे आहे. हे यातून सांगितले.

 या मेळाव्यासाठी उपस्थित महिला उपस्थित होत्या.मुमताज ताई शेख कोरो इंडिया मुंबई, अमोल मिटकरी महिला व बालकल्याण समिती कर्जत उमाताई जाधव ग्रामीण विकास केंद्र संस्था सचिव,प्रा.विक्रम कांबळे साईकृपा महाविद्यालय घारगाव नाजीया पठाण,अर्चना भैलुमे, शुभांगी गोहेर,शितल काळे,विजया काळे,प्रियंका खिलारे, अस्मिता तायडे,प्रेरणा खडके, सचिन भिंगारदिवे,नंदु गाडे, तुकाराम पवार,राजु शिंदे, ऋषिकेश गायकवाड, दिसेना पवार, राहुल पवार,सुरज तायडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker