नांदणी नदी मधील पाणी साठा वन्य प्राण्यांसाठी राखून ठेवावा
येसवडी अभयारण्य क्षेत्रामुळे हरिणाचे मोठे वास्तव्य, यशोदानंद गोशाळेची मांडणी.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येसवडी परिसरातून वाहणारी नांदणी नदी मधील पाणीसाठा चालू वर्षी पावसाच्या अभावामुळे खूप अत्यल्प राहिला आहे. येसवडी येथे अभयारण्य क्षेत्र असल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हरिणाचे वास्तव्य आहे. या हरिणासाठी तसेच यशोदानंद गोशाळेतील गायी, आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या गायी, मेंढरे, अशा प्रकारचे विविध पशु पक्षी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी जात असतात. त्यामुळे पाणी उपसा थाबून वण्य प्राण्यांसाठी पाणी राखून ठेवण्याचे निवेदन कर्जत तहसीलदारांना यशोदानंद गोशाळेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे या नदीतील पाणी विनापरवाना काही शेतकरी उपसा करत आहेत. शेतीसाठी पाण्याची गरज आहे मात्र वन्यप्राण्यांसाठी देखील तितकीच आवश्यकता आहे. नदीवरील बंधाऱ्यात पाणी अत्यल्प राहिल्याने या नदीतील पाणी उपसा त्वरित थांबवावा. जेणेकरून वन्य प्राणी परिसरातील गायी, बैल, मेंढरे यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील. तशा प्रकारच्या सूचना संबधित विभाग, स्थानिक ग्रामपंचायतला देण्यात याव्यात अशी मागणी या निवेदाद्वारे करण्यात आली.