खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण !

कर्जत (प्रतिनिधी) :- केंद्र सरकार व – महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद अहमदनगर ग्रामीण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजने अंतर्गत जोतीबावाडी येथील जोतीबा मंदिर ते गावठाण रस्ता काँक्रीटीकरण तसेच भैरवनाथ मंदिर ते गवारे यांच्या घरापर्यंत (60 लाख रुपये) केलेल्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामांचा लोकार्पण तसेच कोकणगाव येथील डॉ शामाप्रसाद मुखर्जी रुरबन राष्ट्रीय योजनेअंतर्गत 60 लाख रुपये खर्चुन उभारलेल्या मंगल कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ
पाणीपुरवठा योजना एक कोटी सतरा लाख रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामाच्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आणि हा देशवासियां साठी आनंदाचा व गौरवाचा क्षण असणार आहे. आणि त्या दिवशी पुन्हा दिवाळी साजरी करण्यात यावी या साठी मतदारसंघातील सर्व रेशन कार्ड धारकांना प्रती रेशन कार्ड 4 कीलो साखर व 1 कीलो हरभरा डाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे वाटप खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात सुरू झालेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ कोकणगाव येथून विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्ड वाटप करुन करण्यात आला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.