परीटवाडी रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाद्वारे रास्ता रोकोचा इशारा.

राशिन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशिन परीटवाडी मोहिते वस्ती जिल्हा हद्द डांबरीकरण रस्त्याचे २९२ ०० लक्ष चे काम मा. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असून हे काम ठेकेदार वाय. एन. लाळगे यास मिळाले असून या कामाची मुदत बारा महिने इतकी असून व मुदत संपण्यास काही दिवस बाकी असताना देखील अद्याप कसल्याही प्रकारचे ठोस काम केलेले दिसून येत नाही,
पावसाळया अगोदर टाकलेली खडी विस्कटून रस्त्या बाहेर गेलेली दिसत आहे तसेच खडीमय रस्त्यातून जाताना नागरिकांना व शाळाकरी मुलांना तारेवरची कसरत करावी लागत असून किरकोळ अपघाती घटना देखील या खराब रस्त्यामुळे पहावयास मिळतात या सर्व प्रश्नांबाबत परीट वाडीचे सरपंच विलास काळे व ग्रामस्थ यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळत असून कामाऐवजी फक्त खोटे आश्वासन वारंवार मिळत
असल्यामुळे सरपंच विलास काळे व ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि. ६.३.२३ रोजी भिगवन चौक राशीन येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असा खोचक इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.