मा. आमदार रोहित पवार यांच्यावतीने रमजान ईद निमित्त राशीन येथील मक्का मस्जिद ला मिनरल वाँटर फिल्टर मशीन भेट.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन मधील काझी गल्ली येथील मक्का मस्जिद मध्ये रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत पाच वेळा नमाज अदा करण्यासाठी आलेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय बघता माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्यावतीने मिनरल वॉटर फिल्टर मशीन मक्का मस्जिद साठी मोफत स्वरूपात भेट देण्यात आली आहे. यामुळे नमाज साठी मस्जिद मध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती थंडगार व निरोगी पाणी पिऊन अशा तपत्या उन्हात आपली तहान भागवू शकेल व अशा कठीण उन्हाळ्यात थंडगार पिलेल्या फिल्टर पाण्यामुळे आत्मा तृप्त होऊन माननीय आमदार रोहित पवार यांना अनेक मुस्लिम बांधवांची दुवा मिळू शकेल हे नक्कीच. अशी महत्वकांक्षी वस्तू भेट दिल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या वतीने रोहित पवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त होत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष इमरान शेख, राष्ट्रवादीचे झुंजार नेतृत्व सद्दाम काझी, अल्ताफ शेख जाकीर शेख , पापू काझी, इस्राईल शेख, मोहसीन काझी, साहील काझी, महमूद काझी, असलम काझी, तौसीफ काझी, अब्बास काझी, गुफरान मामू, स्वालेहिन शेख, खालीद मेजर, अमीर काझी, मौलाना हाफिस रहीम व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते.