पत्रकार जावेद काझी यांचा राशिन शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार.

कर्जत प्रतिनिधी :- टीएमसी क्रिएशन सामाजिक संस्था मुंबई यांच्यावतीने पत्रकार जावेद काझी यांना मुंबई वाशी येथे सलाम इंडिया पुरस्काराने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याबद्दल तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, तालुका युवा सेना प्रमुख सोमनाथ नेटके यांच्या मार्गदर्शना खाली राशीन शहर शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जावेद काझी यांचा श्री जगदंबा देवीचा लॅमिनेशन प्रतिमा ,भगवी शाल, श्रीफळ देऊन विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य सत्कार करण्यात आला.
जावेद काझी यांच्याकडून वेळोवेळी सामाजिक, व इतर मूलभूत प्रश्ना बाबत वेळोवेळी महत्वकांक्षी मार्गदर्शन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना होत असल्याचेही जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे व शहर प्रमुख दीपक जंजिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच सर्वांनी यावेळी जावेद काझी यांना भावी वाटचालीच्या अनंत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिंदे सेनेचे जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे ,भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब काझी, युवा नेतृत्व साहिल काझी, उपशहर प्रमुख मच्छिंद्र सुद्रिक ,युवा सेना शहराध्यक्ष योगेश भवर , दुर्गेश वाघ ,सौरभ काळे,सामाजिक कार्यकर्ते सचिन अडबल, शिवसैनिक कार्यकर्ते व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.