जगदंबा देवी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर पेव्हिंगब्लॉक साठी विधान परिषद सदस्य मा.श्री.सत्यजित तांबे यांच्याकडून १० लाखाचा निधी.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील जगदंबा देवी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर पेव्हिंगब्लॉक ब्लॉक बसवण्यासाठी कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव देशमुख यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे या रस्ता दुरुस्ती करिता निधीची मागणी केली असता कसलाही विलंब न करता तात्काळ आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या निधीतून जन सुविधा योजनेअंतर्गत दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे तेथे लवकरच पेव्हिंगब्लॉक बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. रस्त्यावर सध्या खड्डे पडले असून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची तसेच इतर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर तेथील खड्ड्यात पाणी साठल्यामुळे नागरिकांना व इतर भाविक भक्तांना पाणी साचल्याने तेथून ए जा करण्यास कसरत करावी लागत आहे. येथील व्यवसायिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपसरपंच शंकरराव देशमुख यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून निधी मंजूर करून आणला आहे.
तसेच राशीन नजीक काळेवाडी शिवारातील मांढरे वस्ती येथील रस्त्यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शंकरराव देशमुख यांनी तांबे चे आभार मानले आहे.