ईसा शेख यांची मानवाधिकार प्रदेश समन्वयक पदी निवड

राशीन(प्रतिनिधी):-जावेद काझी.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या मानवाधिकार विभागात ईसा शेख यांची प्रदेश समन्वयक म्हणून निवड करण्यात आली, टिळक भवन , प्रभावती, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सर्व विभाग व सेलच्या अध्यक्षा व समन्वयक श्रीमती प्रज्ञाताई वाघमारे, मानवाधिकारचे स्वतंत्र कार्यभार असणारे वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. डॉ.अफसर कुरेशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करणेत आले.
सदर प्रसंगी सेक्रेटरी सुलेमान शेख, सचिव श्रीमती प्रज्ञाताई कांबळे, संयुक्त सचिव श्री ग्यान सायमन, कोकण विभाग प्रमुख अजिज शेख, पश्चिम विभाग प्रमुख सौ मंगलताई सासवडे उपस्थित होते. या प्रसंगी श्रीमती प्रज्ञाताई वाघमारे व वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अफसर कुरेशी यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना या विभागाच्या कार्याची माहिती आणि कार्यपद्धती विशद केली. पदाधिकाऱ्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेऊन कशा प्रकारे सोडवता येतील याचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ईसा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मानवाधिकार विभाग चे आभार मानून दिलेल्या संधीचे सोने करण्याची व संपूर्ण राज्यातील मानवाधिकार विभागातील पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून या विभागाचे कार्य करण्याची ग्वाही दिली.
ईसा शेख यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार व समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.