आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद उर्दू शाळे समोर पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाखाचा निधीचा भूमिपूजन शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- माननीय आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने अल्पसंख्यांक निधीतून राशीन येथील वार्ड क्रमांक ४ मधील काझी गल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळे समोरील ग्राउंड वर पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचा भूमिपूजन शुभारंभ राशीन च्या लोकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते तसेच माजी. उपसरपंच शाहू राजे भोसले पै. शाम भाऊ कानगुडे तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता करण्यात आला असून त्वरित काम सुरू करण्यात आले आहे.
अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला अत्यावश्यक महत्त्वकांक्षी प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी यावेळी आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, शिवसेनाप्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य नाजीम काझी, स्वप्निल मोढळे , मा. सरपंच रामकिसन साळवे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेतृत्व इमरान शेख, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शाेयब काझी, माजी कृषी अधिकारी फारुकभाई काझी, ग्रामविकास अधिकारी गुरव, साहिल काझी, जमीर काझी ,अमोल कुलथे, शुभम बोरा, मुक्तार भाई काझी, इकबाल काझी, अब्बास काझी, शरीफ काझी, आयाज पठाण, राजू भाई शेख, इसाक काझी, सद्दाम काझी, तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका रुबीना सय्यद, जमीला काझी, नौशादबी शेख, असिफा काझी, अबेदा पठाण, सुग्रा बी काझी, जायदा काझी, इतर मुस्लिम बांधव व महिला व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.