श्रमाचे मूल्य जपणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आहे ; आमदार रोहितदादा पवार
आमदार रोहितदादा पवार यांची दादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सदिच्छा भेट

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘हीरक महोत्सवी विशेष श्रमसंस्कार शिबिर’ मौजे कोळवडी येथे संपन्न होत आहे. मंगळवार दि. १६ जानेवारी ते सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या कालावधीत हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरास बुधवारी कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी रोहितदादा पवार यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणामध्ये सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमाचे मूल्य जोपासणारे केंद्र आहे. अशा शिबिरातून आत्मविश्वास वाढीस लागतो, संघर्ष करण्याची सवय जडते. या शिबिराच्या माध्यमातून मुलांना समाजामध्ये वावरण्याची आणि समाजाच्या अडचणी समजून घेण्याचीही सवय लागते, विद्यार्थी आत्मनिर्भर बनण्यास मदत होते.
आमदार रोहितदादांनी शिबिरार्थी स्वयंसेवक यांनी बनवलेल्या पोह्यांचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बहुसंख्य कोळवडी ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.