वन रँक वन पेंशन सह विविध मागण्यांसाठी माजी सैनिक देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कर्जत (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व सैनिक परिवारांना उपस्थित राहण्याचे त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांचे आवाहन.
वन रँक वन पेन्शन सह विविध मागण्यासाठी तसेच मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी माजी सैनिक दिल्ली येथे जंतर-मंतर वर गेले 50 दिवस झाले शहीद वीर पत्नी,वीर माता व माजी सैनिक यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, त्या माजी सैनिकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व माजी सैनिक, शहीद वीर माता, वीर पत्नी,शहीद सैनिक परिवारांच्या अस्मितेच्या प्रश्नासाठी लोकशाही पद्धतीने अहमदनगर जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून वार- सोमवार, दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कर्जत तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तसेच त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी केले आहे.