
कर्जत (प्रतिनिधी) :- आ.प्रा.राम शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त होम मिनिस्टर व डान्स चा धमाका कार्यक्रमाच आयोजन पै. प्रवीण घुले पाटील मित्र मंडळ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महेश तनपुरे यांच्या सह त्यांच्या मित्र परिवारांने मोठ्या दिमाखात केले. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक, अभिनेत्री रूपाली भोसले व विनोदी अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी आमदार राम शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, जयदत्त धस, प्रवीण घुले पाटील, संयोजक महेश तनपुरे,मोहिनी घुले पाटील,महेंद्र धांडे, विलास निकत, विनोद दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी सिनेतारका मानसी नाईक व रूपाली भोसले यांनी अनेक गाण्यांवर नृत्य केले.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. सिने अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी सूत्रसंचालन करत सहकाऱ्यांसमवेत पैठणीचा खेळ घेतला. यामध्ये हेमलता मिसाळ (दुचाकी), मरळ (वॉशिंग मशीन), जयश्री उकरडे (फ्रीज) यांनी बक्षिसे मिळवली. याशिवाय २० सोन्याच्या नथ व २० पैठणी विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले.
यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले की,आता जनतेच्या लक्षात आले आहे की शेवट आपला तो आपलाच असतो, म्हणूनच नवीन वर्षाचे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघातील जनतेला २०२४ चे गिफ्ट म्हणून एमआयडीसी देणारच तसेच येणाऱ्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर कार्यक्रमानिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रवीण घुले पाटील यांनी आ. शिंदे यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. संयोजक महेश तनपुरे आणि विलास निकत यांनी आभार मानले. त्याचबरोबर कार्यक्रमाची उंची वाढविण्याचे काम कर्जत तालुक्यातील निवेदक निलेश दिवटे व दादासाहेब शिंदे यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजु बागवान, अमोल भगत, अमोल कदम,दादासाहेब सुरवसे,गणेश वाळुंजकर, मुन्नाभाई काझी, रिकी पाटील,भोप्याभाई सय्यद,जय गोहेर, दीपक बोराटे, राम जहागीरदार, सौरभ पाटील, शिवम कांबळे आदींनी परिश्रम घेतले.