
कर्जत (प्रतिनिधी) :- आज गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बेनवडी फाट्याजवळ व्यायामासाठी व पोलीस भरतीच्या सरावासाठी
गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना कर्जत – राशीन महामार्गावर घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले .
ओमप्रकाश नाथा धुमाळ वय : १८ या युवकाचा अपघातात गंभीर जखमी होऊन रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. संकेत परशुराम गदादे, वय : १८ व केदार अशोक गदादे वय : १७ हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. हे अपघातातील सर्वजण बेनवडी येथील रहिवासी आहेत. मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
जखमींना उपचारासाठी कर्जतला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते पण त्यातील संकेत परशुराम गदादे वय 18 हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना नगरला श्रीदीप हॉस्पिटल ला नेण्यात आले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच तिसरे केदार अशोक गदादे वय 16 हे केशर हॉस्पिटल कर्जत या ठिकाणी उपचार घेत आहेत. वरील माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल एम.जी.काळे यांनी दिली.
दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे या घटनेने तालुक्यात हाळहाळ व्यक्त केली जात आहे